गडहिंग्लज श्रमिक पत्रकार संघाचा पत्रकार दिनकर पाटील यांना पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2022

गडहिंग्लज श्रमिक पत्रकार संघाचा पत्रकार दिनकर पाटील यांना पुरस्कार प्रदान

पत्रकार दिनकर पाटील यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करताना प्रा. किसनराव कुराडे, सुभाष धुमे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           गडहिंग्लज  श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणार आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. सकाळचे नेसरी बातमीदार दिनकर पाटीलांचा शिवराज विद्या संकुल गडहिंग्लजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते शाल, श्रीफल, सन्मानपत्र, रोख रक्कम, पुस्तके देवून सहपत्नीक सन्मान झाला. 

          प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. कुराडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम शिवराज महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. जेष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दिनकर पाटील हे गेल्या १२ वर्षापासून दै. सकाळ मध्ये ग्रामीण भागात नेसरी बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याची दखल घेऊन श्रमिक पत्रकार संघातर्फे  पुरस्कार प्रदान झाला.  

           जेष्ठ पेपर  वितरक महादेव आडसुळे, कोरोना काळात मुलांची मोफत वाहतूक सेवा करणारे दिपक मणगुतकर यांचाही यावेळी गौरव झाला. शिवराज विद्या संकुलाचे सचिव अनिल कुराडे, दिलीप जगताप,  योग प्रशिक्षक, राम पाटील, प्राचार्य साताप्पा कांबळे, वैजयंता पाटील, अनिल कलकुटगी आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment