शर्विल घोळसे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2022

शर्विल घोळसे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा

शर्विल संजय घोळसे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालयाचे विद्यार्थी शर्विल संजय घोळसे (मलगड) या विद्यार्थ्याने इय‌त्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत २८० गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. यापुर्वीही इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने राज्यात सहावा क्रमांक व प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याला दिनकर तावडे, सौ. सरिता नाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव भोगुलकर, कृष्णकांत बारवेलकर, व्ही. बी. पाटील, ए. डी. पाटील, पालक संजय घोळसे व सौ. संध्या घोळसे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment