कोल्हापूर येथील चंदगड भवनच्या उभारणीत सर्वांचा हातभार - जि. प. सदस्य सचिन बल्लाळ - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2022

कोल्हापूर येथील चंदगड भवनच्या उभारणीत सर्वांचा हातभार - जि. प. सदस्य सचिन बल्लाळ

                                

चंदगड भवन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

कोल्हापूर जि. प. आवारात उभारण्यात आलेल्या  चंदगड तालुका भवन मध्ये चंदगड तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद सदस्यांच्या सिंहांचा वाटा आहे. मात्र जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण आणि विद्याताई पाटील यांनी केवळ आपल्या प्रयत्नांने हे भवन उभारण्यात आल्याचे चंदगड तालुक्यातील जनतेला भासवले जात आहे. याची खंत जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

               कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ठिकाणी जाणा-या जि.प.सदस्य तसेच प.स.चे सदस्य, ग्रा.प.सदस्य व इतर लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी कोल्हापूर ला जावे लागते. जिल्ह्याचे शेवटचं टोक असलेल्या चंदगड तालुक्यातील लोकांना प्रसंगी या भवनाचा उपयोग व्हावा या उद्देशाने चंदगड तालुक्यातील जि.प.सदस्य नी आपल्या वाट्याला येणारा निधी चंदगड भवन उभारणीसाठी दिला. त्यामध्ये आपण स्वता ११लाख, कल्लाप्पा भोगण १३लाख,सौ.विद्याताई पाटील १३ लाख,सौ.मनिषा टोमणे ६लाख, सौ.राणी खमलेट्टी ४ लाख, हेमंत कोलेकर ५लाख अरुण  सुतार ६ लाख, सतिश पाटील ५ लाख  असा निधी या कामी उपलब्ध करून देवून चंदगड  भवनाचा संकल्प पूर्ण झाला आहे, उद्या सोमवारी या भवनाचा उद्घाटन सोहळा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून  होत आहे.मात्र तत्पूर्वी जिल्हा परिषद मधील चंदगड तालुक्यातील सदस्य कल्लाप्पा भोगण व सदस्या विद्याताई पाटील यांनी मात्र हे भवन केवळ आपल्याच निधीतून उभारण्यात आल्याचे भासवले जात असल्याचे खंत जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना व्यक्त केली.

चंदगड तालुका भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शासकीय पध्दतीने काढली जाईल मात्र दरम्यान तालुक्यात वाटल्या जाणा-या पत्रिकेवर छापण्यात आलेल्या पहिल्या पानावर जि.प.सदस्य सतीश बल्लाळ,अरुण सुतार यांना स्थान नाही,इतकेच काय चंदगड विधानसभा आमदार राजेश पाटील यांना ही स्थान नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सचिन बल्लाळ व  अरुण  सुतार यांच्या सूचनेप्रमाणे सीईओंनी सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत यामध्ये एकूण निधी 61 लाख रुपये जमा झाले व आत्तापर्यंत 52 लाख रुपये निधी खर्च झाला आहे. त्यामुळे पहिल्या मधल्या साठी उर्वरित लागणार इं निधी आदरणीय पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांनी देण्याचे अभिवचन दिले आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चंदगडचे आमदार आदरणीय राजेश पाटील तसेच इतर दोन्ही जि प सदस्य यांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे पण चंदगडच्या जनतेच्या सोयीसाठी निवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दोघांना या तालुक्यातील सर्व नेते तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य कार्यकर्ते यांनी सोमवार दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी उपस्थित रहावे असे आवाहन ही सदस्य सचिन बल्लाळ यांनी केले आहे.









No comments:

Post a Comment