चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील हेरे सरजांम प्रकरणाची तातडीने निर्गत करण्यासाठी प्रत्येक मंडल स्तरावर बैठकींचे आयोजन करणार असल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी सांगितले.काल (सोमवारी)तहसिल कार्यालयात आम .राजेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
चंदगड तालुक्यातील ४७ महसूली गावामध्ये व वाडी विभाजना नंतरचे गांवा मध्ये हेरेसंरजाम वतनाच्या जमीनी असून , सदर जमीनी प्रत्यक्ष कसत , वहिवाटीस असलेल्या शेतक - यांना व कुळांना शासन निर्णय दि . ३१ मे २००१ मधील परि . क्र . १ ते ४ नुसार जमीनी विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन तात्काळ व प्रथम प्राधान्याने निर्गत करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिलेले आहेत. दिनांक ३१/०५/२००१ च्या परिपत्रकात सुचित केल्याप्रमाणे सर्व हेरे सरंजामचे गावातील कामकाज पुर्ण करणेच्या अनुषंगाने प्रत्येक मंडळ व सजा निहाय कालबध्द कार्यक्रमाचे नियोजन करणे बाबत चंदगड तहसिलदार यांना निर्देश दिलेले आहेत . चंदगड तालुक्यातील ४७ महसूली गावे व वाडीविभाजना नंतरचे गावातील सर्व खातेदारांना आवाहन करण्यात येते की , जे खातेदार हेरे सरंजाम इनामाखाली जमिनी धारण करत आहेत , अशा खातेदारांनी संबंधित सजातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , तहसिलदार चंदगड येथे विहीत नमुन्यातील अर्जामध्ये आपला गट नंबर / सर्व्हे नंबर नमुद करुन आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुर्ततेसह प्रकरणे सादर करावीत . तसेच ज्या खातेदारांना नजराना रक्कम भरणे बाबत कळविले आहे . त्या खातेदारांनी नजराना रक्कम भरुन चलनावची प्रत तहसिलदार कार्यालय चंदगड येथे जमा करावी . अशी परिपुर्ण प्रकरणे प्राप्त झालेनंतर शासन परिपत्रकानुसार निकाली काढण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री.वाघमोडे यांनी सागितले.
No comments:
Post a Comment