श्री मल्लनाथ हायस्कुल कानूर खुर्द मध्ये लसीकरण मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2022

श्री मल्लनाथ हायस्कुल कानूर खुर्द मध्ये लसीकरण मोहीम

श्री मल्लनाथ हायस्कुल विद्यार्थी व आरोग्य सेवक मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत लसीकरण

चंदगड / सी. एल.  वृत्तसेवा

         महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 15 ते 18 वयोगटातील विध्यार्थ्यांना लसीकरण करण्याची मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र कानूर खुर्द (ता. चंदगड) च्या वतीने श्री मल्लनाथ हायस्कुल मध्ये संस्था अध्यक्ष  पी. बी. पाटील व मुख्याध्यापक पी. बी. चौगुले  यांच्या उपस्थितीत घेण्यात आली . आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यीका सौ. तुपट यांनी सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणाविषयी प्रबोधन करून मार्गदर्शन केले. यावेळी सेविका उषा गावडे, आशा स्वयंसेविका गावडे व सौ. कांबळे  यांची साथ लाभली.

          नववी व दहावीच्या एकूण 99 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

No comments:

Post a Comment