सांबरे येथे रविवार पुरूष व निमंत्रीत महिला कब्बडी स्पर्धा, श्री कलमेश्वर क्रीडा मंडळाचे नियोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2022

सांबरे येथे रविवार पुरूष व निमंत्रीत महिला कब्बडी स्पर्धा, श्री कलमेश्वर क्रीडा मंडळाचे नियोजनतेऊरवाडी (एस. के. पाटील)

        श्री कलमेश्वर क्रीडा मंडळ सांबरे (ता. गडहिंग्लज) आयोजित कै. किरण पाटील (आर्मी ) यांच्या स्मरणार्थ पुरूष वजनी गट व निमंत्रीत महिला कब्बडी स्पर्धांचे आयोजन रविवार दि.९ जानेवारी 2022 रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे.

    विद्या मंदिर सांबरेच्या क्रीडांगणावर सर्व कोविड नियमांचे पालन करत या स्पर्धांचे उदधाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर असणार आहेत. ध्वजारोहन ओलम चे मॅनेजिंग हेड भरत कुंडल यांच्या हस्ते तर प्रतिमा पूजन रियाज शमनजी यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धासाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे -

 *निमंत्रित महिला गट -* 

अनुक्रमे ७००० , ५००० , ३००० , २००० हजार रुपये व चषक


 *७० किलो वजनी पुरूष* 

अनुक्रमे  १५००० , १०००० , ७००० हजार रुपये व चषक


 *_५२ किलो- पुरूष_* 

अनुक्रमे ७००० , ५००० , ३००० हजार रूपये व चषक 


 *४२ किलो  पुरुष* 

अनुक्रमे ५००० , ३००० , २००० हजार रुपये व चषक 

याबरोबरच उत्कृष्ठ चढाई व पकडीसाठी चषक व देण्यात येणार आहेत .

          सोमवार दि १० रोजी बक्षिस वितरण कार्यक्रम आजरा कारखाना चेअरमन सुनिल शिंत्रे,   माजी जि. प. सदस्य  संग्राम कुपेकर, जि. प. सदस्य हेमंत कोलेकर, सभापती अनंत कांबळे आदि मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

   तरी या स्पर्धांचा लाभ खेळाडूनी घेण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एन. के. पाटील, अध्यक्ष महादेव वाईंगडे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, खजिनदार संकेत वाईंगडे, दिपक शिंदे व केराप्पा पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment