शिनोळी येथे सोने दुकानदाराला तिघांकडून माराहाण - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2022

शिनोळी येथे सोने दुकानदाराला तिघांकडून माराहाण

  


चंदगड / सी एल वृत्तसेवा

       शिनोळी खूर्द (ता. चंदगड) येथील राधेशाम ज्वेलर्स चे मालक सागर यल्लापा गुडेकर याना दुकानात घुसून वैजनाथ मारूती मेणसे,उमाजी लक्ष्मण ओऊळकर व श्रीकांत बामुचे (तिघेही रा.शिनोळी खूर्द,ता.चंदगड)यानी माराहाण केल्याची फिर्याद श्री.गुडेकर यांनी चंदगड पोलीसात दिली आहे.

   याबाबत पोलिसातून मिळालेली माहीती अशी फिर्यादी सागर यानी स्थानिक व्यापारी नावच्या व्हॅटस्अप ग्रुप वर आपले घर दार,जमीन,विकण्याची पोस्ट शेअर केली होती,या पोस्ट ला वैजनाथ मेणसे याने प्रत्युत्तर देत सागर यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली.त्यानंतर राधेशाम ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात  वैजनाथ  मेणसे,उमाजी  ओऊळकर व श्रीकांत बामुचे हे तिघेजण जबरदस्तीनं घुसून सागर याच्या तोंडावर, पाठीवर,डोक्यात व उजव्या हातावर ठोशांनी मारून गंभीर जखमी केले.व रात्री पन्नास गावगुंड घेवुन येवुन तुला जीवंत सोडणार नाही.अशी धमकी दिली.त्यामुळे फिर्यादी सागर डागेकर यानी चंदगड पोलीसात तक्रार दिल्याने तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक तपास सहायक फौजदार जाधव करत आहेत. No comments:

Post a Comment