'अनाथांची माय' सिंधुताईंना रांगोळीतून श्रद्धांजली! औरवाडकर यांचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2022

'अनाथांची माय' सिंधुताईंना रांगोळीतून श्रद्धांजली! औरवाडकर यांचा उपक्रम

अजित औरवाडकर, बेळगाव यांनी सिंधुताईंची अशी रांगोळी काढून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
 जेष्ठ समाजसेविका ,अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ नंयाचे नुकतेच दुःखद निधन झाले.   रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी सिंधुताई यांचे रांगोळीतून चित्र काढून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
कलाकार अजित औरवाडकर

   वडगाव-बेळगाव येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी  ही कलाकृती नाझर कॅम्प, यळ्ळूर रोड, माधवपूर- वडगाव बेळगाव येथील आपल्या ज्योती स्टुडिओत दिनांक ६ ते ९ जानेवारी चार दिवस सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पाहण्यासाठी ठेवली आहे. त्यांना ही रांगोळी टाकण्यास सात तासांचा कालावधी लागला.
अजित यांनी विविध दिनविशेषांचे औचित्य साधून यापूर्वी १३० रांगोळी कलाकृती तसेच नाविन्यपूर्ण साधनांचा वापर करून रेखाटलेल्या इतर कलाकृतींना मोठा प्रतिसाद लाभला होता. यापूर्वी त्यांनी  भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, लता मंगेशकर, सनई वादक बिस्मिल्ला खान, वल्लभभाई पटेल, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, एपीजे अब्दुल कलाम, अण्णा हजारे, लष्कर प्रमुख बिपिन रावत, संत ज्ञानेश्वर, नरेंद्र मोदी यांसह बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक सामाजिक प्रश्नावरील रांगोळ्या कलाप्रेमी रसिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. 
  औरवाडकर यांचे या निमित्ताने कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment