कोल्हापूर येथील चंदगड भवनची इमारत. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
राज्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर येथे जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण व जि. प. सदस्या सौ. विद्या पाटील यांच्या स्वनिधीतून साकारलेल्या चंदगड भवन या इमारतीचा उदंघाटन समारंभ सोमवार १o जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्दक्षस्थानी कोल्हापूरचे पालक तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील असणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जि. प. अध्यक्ष राहूल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आमदार राजेश पाटील यांच्यासह जिल्हा व चंदगड तालूक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन जि. प. चे स्थायी समिती सदस्य कल्लाप्पा भोगण, जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. विद्या पाटील यानी केले आहे.
No comments:
Post a Comment