बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेत उपविजेता ठरलेला तुडिये संघ. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या 'चंदगड तालुका मर्यादित बिग बॅश लीग २०२२' क्रिकेट स्पर्धेत तुडिये संघाने उपविजेतेपद पटकावले. दत्तसाई तुडीये संघाचा अंतिम फेरीतील सामना ध्रुव इलेव्हन चंदगड संघाबरोबर होता.
तुडिये संघाच्या वतीने कर्णधार सुहास पाटील, यांच्यासह प्रवीण गावडे, संतोष हुलजी, प्रवीण पाटील, नंदकुमार बामुचे, वैभव खांडेकर, कन्हैया कोकितकर, तानाजी पाटील, ज्योतिबा पाटील, सागर बोकडे, महेश गावडे, किर्तीकुमार बेनके, विकास बिर्जे यांनी उत्कृष्ट खेळ केला. संघ व्यवस्थापक म्हणून रामलिंग शिनोळकर, गणपती देवळी, सागर पाटील, विश्वनाथ बिर्जे, तात्या सुतार, सागर नरगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment