चंदगड नगरपंचायतीचा आगळा-वेगळा उपक्रम, उपक्रमांची स्वच्छ महाराष्ट्र अभियान ने घेतली दखल, काय आहे हा उपक्रम, वाचा........ - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2022

चंदगड नगरपंचायतीचा आगळा-वेगळा उपक्रम, उपक्रमांची स्वच्छ महाराष्ट्र अभियान ने घेतली दखल, काय आहे हा उपक्रम, वाचा........

वृक्षारोपण करताना चंदगड नगरपंचायतीचे पदाधिकारी.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          'चंदगड शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत अनेक उपक्रम राबविणे सूरू आहेत. अशा अनेक उपक्रमामधील आर ऍक्टिव्हिटी (रिड्युस - रियुज - दि साईकल) अंतर्गत संभाजी चौक येथे बुक बँक चालू केला आहे. 

         आपल्या जवळील जुनी वाचुन झालेली अथवा घरामध्ये असलेली पुस्तके आपण या बुक बँकेत आणून देऊ शकता. या पुस्तकांचा उपयोग गरजू लोकांसाठी होईल व शहरतील घरात पडून असलेले रद्दी (सुका कचरा) तयार होत आहेत. त्याचे देखील प्रभाग कमी व्हावे हे उददेश डोळ्यांसमोर ठेवून हे ग्रंथ विक्रीचे भांडार चंदगड नगरपंचायतीच्या वतीने सुरु केले आहे. या उपक्रमाची दखल स्वच्छ महाराष्ट्र अभियान ने दखल घेवून चंदगड नगरपंचायतीच्या उपक्रमावर लक्ष केंद्रात केले असून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या प्रसार माध्यामावर चंदगड नगरपंचायतीचा वरील उपक्रम प्रसिद्ध केला आहे. या प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक दिलीप चंदगडकर, अभिजीत गुरबे, संजना कोकरेकर, नेत्रदिपा कांबळे, अनिता परीट, ममताज मदार, प्रमिला गावडे, रंजना चंदगडकर, अनुसया दाणी, नुरजहाँ नाईकवाडी यासह सर्व नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment