नेसरी येथील एस. एस. हायस्कूल मधील विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण केंद्राला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2022

नेसरी येथील एस. एस. हायस्कूल मधील विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण केंद्राला भेट

नेसरी येथील एस. एस. हायस्कूल नेसरी मधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण  केंद्राला भेट दिली.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       नेसरी येथील एस. एस. हायस्कूल नेसरी मधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी जलसुरक्षा व भूगोल विषयांस विषयास अनुसरून नेसरी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत असलेल्या जलशुद्धीकरण  केंद्राला भेट दिली.             

        प्रकल्पाचे इंजिनियर सदानंद पाटील या योजनेची माहिती देताना पहिला टप्पा इन-टेक  वेल जॅकवेल इरिगेशन फाउंटन फिल्टरेशन याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले ``नदीच्या पात्रात इन -टेक  वेळ बांधले आहे त्यातील जॅकवेल मध्ये बसलेल्या तीस-तीस एचपी च्या मोटर पंपाच्या सहाय्याने समर्सिबल स्टॅन्ड बाय वन पंपाच्या सहाय्याने पाण्याचे दोन हजार चारशे पन्नास मीटर होऊन इरिगेशन फाउंटन ला पाण्याचा पुरवठा केला जातो. ते दोन फॅक्यू लेटर मध्ये पाण्याची दुसरं होऊन ते पाणी मेनी कोल्ड मधून पाणी वर आणले जाते या जलशुद्धीकरण केंद्र मध्ये गार्डन व्यवस्था आहे. त्यामध्ये चे गार्डन साहित्य वापरले आहे ते २०ते २२ टन साहित्य आहे. त्यामध्ये गुजरातमधील कच्छ भुज येथील वाळू तसेच दोन ट्रक२० एम एम संगमरवरी सागरगोटे  वापरले आहेत. त्यानंतर हे सर्व पाणी शुद्धीकरण होऊन तीन वाळू च्या साह्याने संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो. या संपूर्ण प्रकल्पाला तीन कोटी ३८ लाख रुपये खर्च आला आहे. प्रकल्पासाठी कामगार व कारागीर हे बिहार कोलकत्ता येथून आणले होते. क्षेत्रभेटीचे नियोजन भूगोल वर्षांच्या अंतर्गत भोई यांनी केले. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाय. व्ही. तरवाळ, ए. बी कोरे, श्री. पुजारी, प्रिया कांबळे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment