बेकिनकेरे येथे शहीद जवानांच्या स्मारक- स्वागत कमानीची दुरुस्ती, एकाच ठिकाणी अन् एकाच दिवशी दोघांचे बलिदान - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2022

बेकिनकेरे येथे शहीद जवानांच्या स्मारक- स्वागत कमानीची दुरुस्ती, एकाच ठिकाणी अन् एकाच दिवशी दोघांचे बलिदान

 

बेकिनकेरे : मुख्य मार्गावर शहीद जवानांच्या स्मारक- स्वागत कमानीची दुरुस्ती सुरू असताना.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

कोवाड- बेळगाव मार्गावर बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथे   शहीद जवान भरमा कृष्णा कुटाळे व कल्लाप्पा तुकाराम खादरवाडकर यांच्या नावाने स्मारक - स्वागत कमान उभारण्यात आली आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या स्मारक- स्वागत कमानीची दुरुस्ती करण्यात येत आहे. शहीद जवान भरमा कृष्णा कुटाळे व कल्लापा तुकाराम खादरवाडकर हे दोघे एकाच ठिकाणी व एकाच दिवशी शहीद होण्याचा दुर्दैवी प्रसंग  या बेकिनकेरे गावावर आला होता. २० मे २००५  रोजी  काश्मीर येथील राजुरी मध्ये  अतिरेक्यांच्या हल्यात सदर जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ सदर स्मारक व स्वागत कमान बेकिनकेरे गावच्या बस थांब्याजवळ उभी करण्यात आली आहे. या स्मारकाची दुरुस्ती करण्यासाठी वीरपत्नी लक्ष्मी भरमा कुटाळे (रा. विजयनगर, बेळगाव), त्यांच्या कन्या निकिता कुटाळे, ज्योती कुटाळे तसेच विरपत्नी रेखा कल्लाप्पा खादरवाडकर (रा. गणेशपुर, बेळगाव) व त्यांचे सुपुत्र उमेश खादरवाडकर आदी परिश्रम घेत आहेत.
No comments:

Post a Comment