बेळगावच्या कलाश्री योजनेत सहभागी व्हा, अन् मिळवा 200 ग्रॅम चांदी ! - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2022

बेळगावच्या कलाश्री योजनेत सहभागी व्हा, अन् मिळवा 200 ग्रॅम चांदी !

 

सुळगा : कलाश्री योजनेची माहिती देताना बाळू पाटील व अन्य मान्यवर.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 बेळगाव येथील कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर उद्योग समूहातर्फे सुरु असणाऱ्या कलाश्री योजनेत सहभागी व्हा, 

अन्  200 ग्रॅम चांदीचे मानकरी व्हा, असे आवाहन कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांनी केले आहे. 

या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून तिसऱ्या योजनेतील दुसरा सोडत कार्यक्रम मंगळवार दि. 25 रोजी होणार आहे. 

सुळगा येथे झालेल्या कार्यक्रमात कलाश्री योजनेचे डीलर्स व सुळगा ग्राम पंचायत सदस्य बाळू पाटील म्हणाले, ६०० रुपये भरून या योजनेमध्ये सहभागी होता येते. ज्यांनी पहिला व दुसरा हप्ता भरला नसल्यास दि. 25 जानेवारी पर्यंत भरून  दुसऱ्या सोडतचे बंपर बक्षिस 200 ग्रॅम चांदी मिळवण्याची संधी आहे. प्रत्येक महिन्याला 600 रुपये असे 15 महिने भरल्यानंतर त्यामध्ये प्रोत्साहनपर धन म्हणून कलाश्री उद्योग समूहाकडून 1 हजार रुपये देण्यात येतील. एकूण दहा हजार रुपये जमा झाल्यानंतर दोन हजार रुपयांचे किराणा साहित्य कलाश्री सेंटर मधून घ्यावयाचे आहे. शिवाय एकूण रकमेतून   कलाश्री कडील फर्निचरही खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला होणाऱ्या बंपर बक्षिसाचा मानकरी होण्याची संधीही मिळणार आहे.

या योजनेला सुळगा येथे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांनी सांगितले.

यावेळी पप्पू पाटील, मोहन पाटील, धाकलु कदम, मल्लाप्पा निलजकर, नंदू धामणेकर, सागर येळूरकर, परशराम पाटील यांच्यासह योजनेचे सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सदर योजनेची सोडत मंगळवार दि. 25 रोजी सायंकाळी 5.00 वाजता कलाश्री टॉवर, खानापूर रोड उद्यमबाग, बेळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.



 

No comments:

Post a Comment