तुर्केवाडी येथील ब्रम्हलिंग देवालयाचा `ब` वर्गात समावेश करणार - नामदार हसन मुश्रीफ, श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2022

तुर्केवाडी येथील ब्रम्हलिंग देवालयाचा `ब` वर्गात समावेश करणार - नामदार हसन मुश्रीफ, श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सांगता

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सव कार्यक्रमात बोलताना नामदार हसन मुश्रीफ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील श्री ब्रह्मलिंग देवालयाला पर्यटन 'ब' वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच ५ कोटीचा निधी मंदिर परिसर विकासासाठी देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागात भक्तिमय वातावरण आणि भक्ती भाव या कलयुगात कमीच पाहायला मिळतो. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहून अध्यात्मिक समाधान मिळाल्याचे  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सागितले.

         ते तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या सांगता समारंभात बोलत होते. 

         यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, ``जीवनात अनेक दुःख, संकटं असतात. अशा अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेतल्यास ती दूर होतात. तसेच या अशा भक्ती भावाच्या वातावरणात मिळालेलं समाधान मोठ आहे. त्यामुळे या ठिकाणी येण्याची भाग्य मिळालं, आमच्या पुण्याईत भर पडल्याची भावना  पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

           यावेळी चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील, शिवसेना संघटक संग्राम कुपेकर, गोपाळराव पाटील, जि. प.सदस्य अरुण सुतार, कल्लाप्पा भोगण, विक्रम चव्हाण, संभाजीराव देसाई, विलास पाटील यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                               पुढच्यावेळी हेलिकॅप्टर नक्की...

            यावेळी या सोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार होती, त्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून देवू शकलो नाही याची त्यांनी खंत व्यक्त केली. हेलिकॅप्टर पोहचू शकले नसले तरी विकास काम नक्कीच पोहोचेल त्यामुळे तुर्केवाडी गावाने शब्द टाकावा, तो नक्कीच पूर्ण केला जाईल असे आश्वासन मंत्री सतेज पाटील यानी दिले. तसेच पुढच्या वेळी 101 व्या पुण्यतिथी महोत्सवाला हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी पुष्पवृष्टीसाठी हेलिकॅप्टर देण्याची ग्वाही दिली.

           

No comments:

Post a Comment