कलिवडे धनगरवाडा येथे वाघाने केली गाय फस्त, धनगरवाड्यावर वाघाच्या फेऱ्या वाढल्या - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2022

कलिवडे धनगरवाडा येथे वाघाने केली गाय फस्त, धनगरवाड्यावर वाघाच्या फेऱ्या वाढल्या

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कलिवडे पैकी धनगरवाडा (ता. चंदगड) येथे केदारी भागोजी जानकर या शेतकऱ्याच्या दुभत्त्या गाईवर काल वाघाने हल्ला करूूून ठार केले. हि घटना काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. केदारी जानकर यांनी काल दुपारी अकरा वाजता भैरू जानकर यांच्या जंगला लगत असलेल्या शेतात केदारी याने आपली जनावरे चरायला सोडली होती. अचानक जंगलातून वाघाने जनावरांवर हल्ला केला. यामध्ये इतर जनावरे पळून गेली.गाय मात्र वाघाच्या तावडीत सापडला. वाघाने गाईला जंगलात ओढून नेत तोंडाकडून गाईला फस्त केले. दरम्यान घटनास्थळी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखली वनपाल दत्ता पाटील यांनी भेट दिली देऊन पंचनामा केला आहे.

                बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

      केदारी जानकर यांची दिवसाला आठ लिटर दुध देणारी गाय होती. गाईचे दुध विकून जानकर उदरनिर्वाह करत होता. मात्र आता वाघाने गाय फस्त केल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत जानकर कुटुंबिय आहेत. त्यामुळे वनविभागाने बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई अशी मागणी केली आहे.

                              वाघ मानवी वस्तीत

            काल सोमवारी रात्री नऊ वाजता कलिवडे गावातून धनगरवाड्याकडे जात असताना वाटेतच शाहु जानकर व मनोज बाजारी दुचाकीवरून घरी जात असताना वाटेतच वाघ आडवा आला.यावेळी शाहु व मनोज यानी जोराने बोंब मारत गाडीचा आवाज जोरात केल्याने वाघ जंगलात शिरला त्यामुळे या दोघांतल संकट टळले. भक्ष्याच्या शोधात वाघ जंगलातून वस्तीकडे येत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वनक्षेत्रपाल आवळे यानी केले आहे.

No comments:

Post a Comment