स्वर्गीय लता मंगेशकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील सुप्रसिध्द चित्रकार मारूती आंबेवाडकर यांनी स्वरसम्राज्ञी भारतरत्न कै. लता मंगेशकर यांना रांगोळीद्वारे श्रध्दांजली वाहिली. लेक कलरचा वापार करुन त्यांनी हि रांगोळी रेखाटली असुन ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना ६ तासांचा अवधी लागला आहे. मारूती आंबेवाडकर हे टिळकवाडी (बेळगाव) हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत असुन गेली ५ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.
कुदनूर लक्ष्मी गल्ली येथील आंबेवाडकर यांच्या राहत्या घरी बुधवार दि. १० फेब्रुवारी पर्यंत सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत ही रांगोळी नागरिकांना पाहता येणार आहे.
No comments:
Post a Comment