तानाजी माणु शेळके |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील ग्रा. पं. मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी तानाजी माणु शेळके (वय वर्षे - २७) या कर्मचाऱ्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. हि घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकी जवळ घडली.
चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात जखमी तानाजी माणु शेळके यांची भेट घेवून विचारपूस करताना प्र. वनक्षेत्रपाल पाटील व इतर कर्मचारी. |
गायरान मधल्या टाकीकडे देखभाल पाण्याची उपलब्धता पाहण्यासाठी शेळके आज (मंगळवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेळके हे गेले असता अचानक अस्वलाने त्यांचेवर हल्ला केला. मात्र पायात गणबुट व अंगात थंडीचे जॅकेट असलेने अस्वलाची नखे खोलवर लागली नाहीत. यामध्ये श्री शेळके यांच्या डाव्या खांदयाला किरकोळ नखांचे ओरखडे व जखमा झाल्या आहेत. त्यानंतर प्रसंगावदान पाहुन श्री शेळके हे काजुच्या झाडावर चढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला, तरीही अस्वलाने तीनवेळा येऊन झाडावर हल्ला केला. झाडांची साल ओरखडुन चावली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या गाडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे आणुन त्यांचेवर उपचार करणेत आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. याकामी प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी, वनपाल एन. एम. धामणकर, वनरक्षक प्रकाश शिंदे, मेघराज हुल्ले, डि. एस. रावळेवाड, वनमजुर नारायण गावडे, पी. एन. नागुर्डेकर, विश्वनाथ नार्वेकर उपस्थित होते. वनक्षेत्रात गुरे चारायला जाताना किंवा वनक्षेत्रानजीक शेतात वावरतांना स्थानिकांनी सावधानी बाळगावी असे आवाहन प्र. वनक्षेत्रपाल पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment