शुभम बांदिवडेकरचे बीएचएमएस परीक्षेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2022

शुभम बांदिवडेकरचे बीएचएमएस परीक्षेत यश

 शुभम बांदिवडेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          नागनवाडी (ता. चंदगड) येथील शुभम सुभाष बांदिवडेकर यांने बीएचएमएस परिक्षेत घवघवीत यश मिळवले. शुभमने बेळगावमध्ये भरतेश मेडिकल कॉलेज अंतर्गत - बेंगलोर विद्यापीठामध्ये बीएचएमएस पदवीमध्ये उतुंग भरारी घेतली. प्राथमिक शिक्षण मराठी विद्या मंदिर नागनवाडी येथे, माध्यमिक शिक्षण धनंजय विद्यालय नागनवाडी, उच्च माध्यमिक शिक्षण एन. बी. पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड येथे तर पुढील शिक्षण बेळगाव येथील भरतेश मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन बीएचएमएस पदवी प्राप्त केली. याबद्दल नागनवाडी त्याचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे. त्याला याकामी आई - वडील व मार्गदर्शक शिक्षकांचे सहकार्य लाभले. ढेकोळी येथील विद्यालयाचे शिक्षक सुभाष बांदिवडेकर यांचा शुभम हा चिरंजीव आहे.

No comments:

Post a Comment