चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
सुळये (ता. चंदगड) येथील श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण कांबळे यांची वैद्यकीय उपचाराची फाईल दि. ७/२/२०२२ रोजी हरवली आहे. पायाचे हाड फॅक्चर झाल्याने लक्ष्मी या डॉक्टर हत्तरगी हॉस्पिटल गडहिंग्लज येथे उपचार घेत होत्या. दि. ७ रोजी नजरचुकीने ही फाईल (शक्यतो दवाखान्यातून) कोणीतरी घेऊन गेले आहे. त्यात उपचारांच्या कागदपत्रासह रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे आहेत. तरी सदर फाईल कोणाकडे असल्यास हत्तर्गी हॉस्पिटल किंवा ९४०३६००९८४ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment