नांदवडे येथील सुधाकर पाटील यांची मनसेच्या मराठी कामगार सेना कोल्हापूर जिल्हा कामगार सचिवपदी नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2022

नांदवडे येथील सुधाकर पाटील यांची मनसेच्या मराठी कामगार सेना कोल्हापूर जिल्हा कामगार सचिवपदी नियुक्ती

सुधाकर महादेव पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदवडे (ता. चंदगड) येथील सुधाकर महादेव पाटील यांची मराठी कामगार सेनेच्या कोल्हापूर जिल्हा कामगार सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मनसे व अध्यक्ष मराठी कामगार सेना महेश जाधव यांनी दिले आहे. 

        श्री. पाटील यांची नेमणूक हि एक वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आली आहे. आज मराठी कामगारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्याची विश्वासार्हता जपणे महत्त्वाची जबाबदारी आहे. मराठी कामगार सेनेच्या पुढील कार्यात मराठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्याची तत्परता दाखवून अभ्यासपूर्ण सक्रीय होण्यासाठी त्यांची हि नियुक्ती देण्यात आली आहे. 

 नियुक्तीनंतर श्री. पाटील यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी माझा नेहमी प्रयत्न राहीन असे सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment