शिल्पा सरपोतदार यांच्या हस्ते निवडीचे पत्र स्वीकारताना चंद्रकांत नेवरेकर सोबत शिवसेना पक्षाचे पदाधिकारी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शिवसेनेचे चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुका माजी संपर्कप्रमुख चंद्रकांत नेवरेकर (मुळगाव परोली, ता. आजरा) यांची शिवसेना प्रणित 'शिव सहकार सेना' मुंबई शहर संघटक पदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र शिल्पा अतुल सरपोतदार (प्रदेशाध्यक्ष शिव सहकार सेना महाराष्ट्र) यांनी नुकतेच मुंबई येथे नेवरेकर यांना प्रदान केले. पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निवडीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
चंद्रकांत नेवरेकर हे १९८० पासून बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आत्तापर्यंत चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुका संपर्कप्रमुख, किसान सेना संपर्क प्रमुख कोल्हापूर, महाराष्ट्र वाहतूक सेना सरचिटणीस अशा अनेक पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. गडहिंग्लज उपविभाग व जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून आजही त्यांनी या कामी वाहून घेतले आहे. चंद्रकांत नेवरेकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे गडहिंग्लज उपविभागासह कोल्हापूर जिल्हा व मुंबई येथे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment