चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त उपस्थित शिक्षकवर्ग. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कवीवर्यं कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य आर. आय. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले.
"मराठी भाषा ही श्रीमंत असून तिला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण करून संवर्धन केले. आमच्या भावनांची अभिव्यक्ती करण्याचे प्रभावी व उत्कृष्ट माध्यम मराठी भाषा आहे. सर्व व्यवहार, गरजा, भावना, मत, आचार विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी ही मायबोली फारच उपयुक्त ठरते. मराठी भाषेला चांगले दिवस यावेत. सन्मान वाढवून तिचे सौंदर्य खुलावे. यासाठी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांनी मराठी भाषा समृद्ध व सुसंस्कृत केली." असे प्रतिपादन प्राचार्य आर.आय. पाटील यांनी केले.
यावेळी एम. व्ही. कानूरकर म्हणाले, 'आजची मराठी दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. स्वाभिमानशून्य लोक आपल्या मातृभाषेला अविकसित म्हणत आहेत. क्षूद्र व तुच्छ गावठी भाषा असे संबोधलै जात आहे. श्रीमंत किंवा शिक्षित लोक कान्व्हेंट स्कूलमध्ये आपल्या मुलांना पाठविण्याचा आग्रह धरू लागले. आई-वडिल हा मायेचा शब्द जाऊन मम्मी डॅडीचे फॅड येऊ लागले आहे."
यावेळी पुस्तक परिचय स्पर्धा घेण्यात आली. ग्रंथपाल शरद हदगल यांनी ग्रंथप्रदर्शन भरविले. कार्यक्रमाला ज्येष्ठ अध्यापक एन. डी. देवळे, आर. पी. पाटील, टी. एस. चांदेकर, टी. टी. बेरडे, वर्षा पाटील, विद्या शिंदे, व्ही. के. गावडे, बी, आर, चिगरे, पुष्पा सुतार, वर्षा पाटील, विद्या शिंदे, डी. जी. पाटील, सचिन शिंदे, सूरज तुपारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या डोंगरे यांनी तर आभार जयसिंग पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment