रविवार २७ फेब्रुवारी रोजी देशव्यापी पल्स पोलिओ मोहिम - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2022

रविवार २७ फेब्रुवारी रोजी देशव्यापी पल्स पोलिओ मोहिम

 


तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी देशव्यापी पल्स पोलिओ मोहिम आयोजित केलेली आहे. या मोहिमेमध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना तोंडावाटे पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत.

या मोहिमेसाठी चंदगड तालुक्यामध्ये एकूण 181 बूथ तयार केलेले आहेत. चंदगड तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये बूथ आयोजित केलेले आहेत. ऊस तोड मजूर ,वीटभट्टी कामगार ,फिरते कामगार इत्यादी लोकांच्या बालकांना लस देण्यासाठी मोबाईल बूथ ( फिरते बूथ) आयोजित केलेले आहेत.  तसेच तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये बसस्थानकामध्ये सुद्धा लस देण्याची विशेष सोय करण्यात आलेली आहे.

सदरील मोहीम रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित केलेली आहे. भारत देश हा पोलिओ निर्मूलनाच्या उंबरठ्यावर असल्याने चंदगड तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना सदरील दिवशी जवळच्या पोलिओ बूथ वर जाऊन पोलिओ डोस पाजून घ्यावे, असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बाबूलाल सोमजाळ   व तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment