ढेकोळी येथील टू-व्हीलर मेस्त्रीचा अपघाती मृत्यू , कोठे घडली घटना.. - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2022

ढेकोळी येथील टू-व्हीलर मेस्त्रीचा अपघाती मृत्यू , कोठे घडली घटना..

 

जोतिबा परशराम नाईक

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

हलकर्णी फाटा, साखर कारखाना रोड (ता. चंदगड) येथील टू व्हीलर गॅरेजचे मेस्त्री जोतिबा परशराम नाईक (वय ३७) यांचा गुरुवार दि. २४ रोजी अपघाती मृत्यू झाला. 

     याबाबत अधिक माहिती अशी की, जोतिबा यांचे गत काही वर्षांपासून बेळगाव -वेंगुर्ला राज्यमार्गावर, हलकर्णी फाटा, साखर कारखाना मार्गावर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. तर बुधवार दि. २३ रोजी रात्री १० वाजता आपले काम संपवून ते आपल्या ढेकोळी (ता. चंदगड) या गावाकडे परतत असताना तुर्केवाडी फाटा ते वैताकवाडी फाटा या दरम्यान पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात जोतिबा गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक ६ वर्षाचा मुलगा तर दुसरा ४ वर्षाचा मुलगा असा परिवार असून गुरुवारी सायंकाळी ढेकोळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.No comments:

Post a Comment