वीस वर्षानंतर सत्तांतर, कालकुंद्री दूध संस्था निवडणूक, वाचा कोणी मारली बाजी........... - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2022

वीस वर्षानंतर सत्तांतर, कालकुंद्री दूध संस्था निवडणूक, वाचा कोणी मारली बाजी...........

कालकुंद्री श्रीकृष्ण दूध संस्थेत  सत्तांतर घडवणारे विजयी उमेदवार (बसलेले) सोबत समर्थक.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्रीकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक (२०२२-२७) शनिवार दि. १२/०२/२०२२ रोजी पार पडली. याच दिवशी मतमोजणी होऊन सायंकाळी पाच वाजता निकाल लागला. दूध संस्था वर्तुळात निकालाबाबत असलेले अंदाज फोल ठरवत वीस वर्षानंतर संस्थेत सत्तांतर घडले. श्रीकृष्ण दूध संस्था परिवर्तन पॅनेलने सत्तारूढ पॅनेलला धोबीपछाड देत उभे केलेले सर्वच उमेदवार निवडून आणण्याचा पराक्रम केला. विजयी उमेदवार व समर्थकांनी निकालानंतर मुख्य चौकात जल्लोष केला. सत्तारुढ गटाचे दोन सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्यामुळे संस्थेत ९ विरुद्ध २ असे बलाबल झाले आहे.

           दोन्ही पॅनेलचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे- विजयी परिवर्तन पॅनेल- प्रकाश गणपती कोकितकर- १४५, अशोक रामू पाटील १४८, मारुती परशराम पाटील- १४२, शांता तातोबा पाटील- १४९, सविता शिवाजी पाटील- १५२, भरत वाकोजी मुंगुरकर- १४१. महिला राखीव गट- शोभा शिवाजी तेऊरवाडकर- १४७, अनिता संभाजी पाटील- १५७. अनुसूचित जाती/ जमाती गट-  पांडू सटूप्पा कांबळे- १४३.

         पराभूत सत्तारूढ पॅनेल सर्वसाधारण गट- प्रकाश शिवाजी कोकितकर- १११, श्यामराव तुकाराम जोशी- ११८, अनिल कृष्णा पाटील- १२३, अरविंद गोविंद पाटील- ११५, नरसु हनमंत पाटील- १०६, मनोहर हनमंत पाटील-११४, महिला राखीव गट- वंदना प्रल्हाद पाटील- १२४, संपदा मारुती पाटील- १०६, अनुसूचित जाती गट- साताप्पा लक्ष्मण कांबळे- १२६.

            सत्तारूढ पॅनेलचे सलीम काशीम मोमीन व सिद्धाप्पा इराप्पा नाईक हे यापूर्वीच बिनविरोध आले आहेत. चुरशीने झालेल्या निवडणुकीत ३०७ मतदारांनी आपला हक्क बजावला. केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथील केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. 

No comments:

Post a Comment