अजित औरवाडकर बेळगाव भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची टाकलेली रांगोळी. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
प्रसिद्ध गायक 'भारतरत्न' पंडित भीमसेन जोशी यांच्या ४ फेब्रुवारी २०२२ या जन्मशताब्दी वर्षातील पहिल्याच दिवशी वडगाव- बेळगाव येथील सुप्रसिद्ध चित्र व रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी पंडितजींना रांगोळी कलेतून आदरांजली वाहिली. रांगोळीतून हे भावचित्रतयार करण्यासाठी अजित यांना तब्बल सहा तास वेळ लागला. २ बाय २ फूट आकाराची ही आश्चर्यकारक रांगोळी कलाकृती पाहण्यासाठी अजित औरवाडकर यांच्या नाझर कॅम्प, यळ्ळूर रोड, माधवपूर, वडगाव बेळगाव येथील निवासस्थानी (ज्योती स्टुडिओ) कला रसिकांची गर्दी होत आहे. ही रांगोळी कलाकृती दि. ८ पर्यंत सकाळी ८ ते रात्रौ ८ पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. अजित औरवाडकर यांनी यापूर्वी ऐतिहासिक, कला क्षेत्रातील व्यक्ती, नेते, क्रांतिकारक, राष्ट्रीय सण, ऐतिहासिक दिनविशेष यानिमित्ताने शेकडो रांगोळ्या टाकल्या असून त्यांना उदंड प्रतिसाद लाभला आहे. पंडित भीमसेन जोशी यांची कृष्ण-धवल रांगोळीही रसिकांच्या पसंतीस उतरली आहे.
No comments:
Post a Comment