दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२१-२२ या तिस-या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाची ३१जानेवारी २०२२ पर्यंतची बीले व तोडणी वाहतुक बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.
चेअरमन मानसिंग खोराटे |
अथर्व-दौलत कारखान्याने यावर्षी एफ.आर.पी निश्चित दरापेक्षा जादा दर देवून अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. या येणाऱ्या ऊसासाठी प्रति मे.टन रु.२९०१/- प्रमाणे दर जाहिर करुन वेळेत अदा केलेला आहे. १६जानेवारी ते ३१जानेवारी २०२२ या कालावधीत ६६४३४मे. टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे. या ऊसाचे बिल १९२७.२५ लाख रुपये कारखान्याने बँकेत शेतकऱ्यांच्या खाती नुकतेच जमा केलेले आहेत. तसेच याबरोबर तोडणी वाहतुक बिलेही जमा केलेली आहेत. कारखान्याने ३१ जानेवारी २०२२ अखेर एकूण ४०२०४१ मे. टनाचे ११६ कोटी ६३ लाख रुपये इतके बिल आजअखेर शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केलेले आहेत. याबरोबर तोडणी वाहतुक कंत्राटदाराचीही सर्व बिले अदा केली आहेत अशी माहिती अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेडचे चेअरमन मा. मानसिंग खोराटे यांनी दिली.
यावर्षीच्या हंगामामध्ये कारखान्याने कांही मशिनरीमध्ये तांत्रिक बदल करुन गाळपामध्ये सातत्य ठेवले आहे. त्यामूळे आजअखेर चांगले गाळप उदिष्ट पूर्ण झाले आहे. शेती विभागाने ऊसाचा समतोल साधून कारखान्याला चांगल्या व योग्य प्रतीचा ऊस आणलेला आहे. शेतकरी, तोडणी वाहतुक यंत्रणा व शेती विभाग स्टाफच्या सहकार्याने अवकाळी पावसामध्येही कारखान्याचे गाळप नियमीत ठेवून उल्लेखनीय काम केले आहे. कारखान्याचे पूर्णपणे काटेकोर नियोजन, भ्रष्टाचार शून्य कारभार व नियंत्रण यामूळे राज्यस्तरीय पातळीवर कारखान्याच्या चांगल्या कामकाजाची दखल घेऊन ऊसदर व वेळेवर ऊसबिले अदा याबाबत चांगल्याप्रकारे उल्लेख होवून हा कारखाना अभिनंदनास पात्र ठरला आहे. याचे सर्व श्रेय अथर्व व्यवस्थापन व कारखान्याच्या संबंधीत सर्व घटकांना जाते.
अथर्व व्यवस्थापनाकडून कारखान्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेळेवर साखर विक्री केलेने आजअखेर गाळपास आलेल्या ऊसाची तोडणी वाहतुक यंत्रणेची बिले व सध्याच्या कामगारांचे वेळेवर पगार पेमेंटस केलेली आहेत. १६ ते ३१जानेवारी २०२२ या कालावधीतील ऊस बिले पंधरवडा कालावधी नियमाच्या अगोदर अकराव्या दिवशीस अदा करणेत आली आहेत. यामूळे सर्वामध्ये उत्साहाचे वातावरण आहे कारखान्याचे हंगामामध्ये ६ लाख मे. टन इतके उदिष्ठ ठेवले असून यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे असेही श्री. खोराटे यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment