चंदगडला जि. प. चे १ व पं. सं चे दोन मतदारसंघ वाढणार, वाचा कोणते मतदारसंघ आहेत ते........ - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2022

चंदगडला जि. प. चे १ व पं. सं चे दोन मतदारसंघ वाढणार, वाचा कोणते मतदारसंघ आहेत ते........
नंदकुमार ढेरे - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           निवडणूक आयोगाने मतदारसंघांच्या सूत्रात बदल केल्याने आता चंदगड तालुक्यात आता  चंदगड तालुक्यात जिल्हा.परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन मतदारसंघ वाढणार आहेत. त्यानुसार महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा आज राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. या आराखड्यामध्ये काही बदल आयोगाने सुचवले आहेत. हे बदल करून पुन्हा हा आराखडा आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी दिली आहे. सध्या जिल्हा परिषदेचे ६७ प्रभाग आहेत. ४१ हजार १०४ लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य आहे. मात्र, ३६ हजार २३६ लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण धरण्यात आल्याने नवीन ९ प्रभाग होणार आहेत. परिणामी नवीन आराखड्यानुसार एकूण ७६ प्रभाग होणार आहेत. तर पंचायत समितीचे १८ नवीन प्रभाग होणार आहेत. प्रभाग रचना झाल्यानंतर त्याचेवर हरकती मागवूनचं प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम केला जाणार आहे. या नंतर आरक्षण सोडत निघणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडुन जाहीर  केल्या नंतर त्यावर हरकती मागविल्या नंतर हा आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.

         चंदगड तालुक्यात २०१२ साली झालेल्या निवडणुकीत पाच जि.प व पं.स.चे दहा मतदारसंघ अस्तित्वात होते. लोकसंख्येच्या आधारावर २०१७ साली मतदारसंघ संघ सूत्रात बदल केल्याने जि.प.चा एक व प.स.चे दोन मतदारसंघ गोठवण्यात आले होते.पण राज्य शासनाने मतदारसंघांच्या सूत्रात बदल केल्याने आता  चंदगड तालुक्यात जिल्हा.परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन मतदारसंघ वाढणार आहेत,तर कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ९, तर पंचायत समित्यांचे १८ नवे मतदारसंघ तयार होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे एकूण ६७ गट (मतदारसंघ) होते . आता लोकसंख्यानिहाय मतदारसंघांची संख्या निश्चित केली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी ७६ मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. वाढीव मतदारसंघांमुळे चंदगड तालुक्यांतील आणखी तीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा आज राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. या प्रारूप आराखड्यामध्ये काही बदल आयोगाने सुचवले असून त्यामध्ये बदल करून पुन्हा हा आराखडा आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाची मदत २२ मार्चला संपत आहे. त्यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी देखील आता सुरू झाली आहे. 

              प्रभाग रचना झाल्यानंतर त्याचेवर हरकती मागवूनचं प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम केला जाणार आहे. या नंतर आरक्षण सोडत निघणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडुन जाहीर  केल्या नंतर त्यावर हरकती मागविल्या नंतर हा आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतरचं आरक्षण सोडत निघणार आहे.

 नवीन जि. प. व पं. स. मतदारसंघ असे राहतील 

१)माणगाव जि. प. (गट) मतदारसंघात -  माणगाव व अडकूर पं. स मतदारसंघ (गण)

२)गवसे जि. प. (गट) मतदारसंघात - गवसे व कानुर (गण)

३)कुदनूर जि. प. (गट)मतदारसंघात - कुदनूर व कोवाड (गण)

४)तुर्केवाडी जि. प. गट मतदारसंघात - तुर्केवाडी व शिनोळी (गण)

५)तुडये जि. प. (गट) मतदारसंघात - तुडये व हेरे (गण) अशा पध्दतीने प्रभाग रचना राहणार आहे. मात्र हरकती नंतरच निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार हे प्रभाग अधिकृत होतील. 

२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार

१. माणगाव जि. प. :- कल्लाप्पा भोगण,माणगाव पं स.:-मनिषा शिवणगेकर, कोवाड पं स:-नंदीनी पाटील 

२. चंदगड जि. प.  :-सचिन बल्लाळ,चंदगड पं.स.:-दयानंद काणेकर, अडकूर पं स:-बबन देसाई

३. तुर्केवाडी जि. प. :-अरुण सुतार, तुर्केवाडी पं.स.:-विठाबाई मुरकुटे,कालकुंद्री पं.स. :-रूपा खांडेकर

४. तुडये जि. प :- विद्या पाटील, तुडये पं.स.:-जगन्नाथ हुलजी,नांदवडे पं.स.:-ॲड.अनंत कांबळे हे उमेदवार प्रतिनिधित्व करत आहेत.

No comments:

Post a Comment