राष्ट्रीय मतदान दिनानिमित्य विद्यार्थ्यांनी रांगोळींच्या माध्यमातून केले प्रबोधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2022

राष्ट्रीय मतदान दिनानिमित्य विद्यार्थ्यांनी रांगोळींच्या माध्यमातून केले प्रबोधन

अडकूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅली काढली.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        २५ जानेवारी या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्य चंदगड तालूक्यातील विविध शाळामध्ये रांगोळी, निंबध व रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मातदारांचे प्रबोधन केले.

        यावेळी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅली काढली. त्याबरोबरच रांगोळी व निंबध स्पर्धा ही घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धा मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनीनी रांगोळीच्या माध्यमातून विविध संदेश दिला.

No comments:

Post a Comment