विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे काम दौलत विश्वस्त संस्थेने केले - गोपाळराव पाटील, हलकर्णी येथे १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2022

विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे काम दौलत विश्वस्त संस्थेने केले - गोपाळराव पाटील, हलकर्णी येथे १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

 

हलकर्णी येथे १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी दिपप्रज्वलन करताना गोपाळराव पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच एकमेक उद्दिष्ट ठेवून दौलत विश्वस्थ संस्थचे गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय गेली ३० वर्षे यशस्वी वाटचाल करत असून चंदगड तालुक्यातील कित्येक विद्यार्थ्यांना घडवायचे काम येथील प्राध्यापकांनी केले असल्याचे प्रतिपादन दौलत संस्थांचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी केले. ते बारावी कला,वाणिज्य व विज्ञान  या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

             या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी विद्यालय नागणवडीचे मुख्याध्यापक एम. आर. भोगूलकर  व यशवंतराव चव्हाण हायस्कूल सुरुतेचे मुख्याध्यापक एम. एम. सुतार  उपस्थित होते. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून यश मिळवा असे मौलिक विचार मुख्याध्यापक भोगूलकर  मांडले. कोरोनाच्या काळात देखील आपण शिक्षण घेत आहात हे सकारात्मक आहे. योग्यवेळी अचूक निर्णय घेऊन आपण आपले करियर निर्माण करा. तसेच गुणवत्ता असलेले विद्यार्थी नेहमीच यशस्वी हातात. अशा शब्दांत श्री. सुतार यांनी मार्गदर्शन केले.

      प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आर. बी. गावडे यांनी केले. अकरावीच्या विद्यार्थ्यांनिंनी स्वागतगीत व पसायदान सादर केले. या कार्यक्रमाला दौलत विश्वस्त संस्थचे उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते. महाविद्यालयचे प्राचार्य पी. ए. पाटील यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या. प्रा. जे. के. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. एच. के. गावडे, प्रा. एस. एम. प्रा शहापूरकर, प्रा. सी. एम. तेली,  प्रा. एन. एम. कुचेकर, प्रा. आर. एच. काझी यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या कॉलेज व येथील शिक्षकांनी आम्हाला ज्ञानाबरोबरच शिस्त आणि संस्काराची शिदोरी दिली त्याचा निश्चितच आमच्या भावी आयुष्यात उपयोग होणार आहे. असे विद्यार्थी मनोगतातून कु. विनायक पाटील, कु. समीर कांबळे, कुमारी सिध्दी जावीर, अस्मिता पाटील, ऋतुजा भोसले, सुजाता भादवणकार या विद्यार्थ्यांनी कॉलेज विषयी ऋण व्यक्त केले.  यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला आठवण म्हणून साऊंड सिस्टिम भेट दिली.

       कार्यक्रमाला ज्युनियर कॉलेजचे प्रा. व्ही. व्ही. पाटील, डी. जे. भोईटे, एन. एम. मोरे, एन. के. जावीर, एस. पी. घोरपडे, अर्जुन पिटूक, अंकुश नौकुडकर, शाहू गावडे, संजीव चिंचनगी, सौ. गीतांजली पाटील, सौ. एस. डी. पाटील, सौ. जे. एम. उत्तुरे, सौ. एस. एस. सुभेदार, प्रकाश बागडी, गोविंद नाईक, परशुराम नाईक आदीसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एन. पी. पाटील यांनी केले. आभार प्रा. एस. बी. कांबळे यांनी मानले.No comments:

Post a Comment