कर्नाटकात जाण्यासाठी आता आरटीपीसीआर रिपोर्टची गरज नाही - कर्नाटकच्या मुख्य सचिवांचा आदेश - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2022

कर्नाटकात जाण्यासाठी आता आरटीपीसीआर रिपोर्टची गरज नाही - कर्नाटकच्या मुख्य सचिवांचा आदेश


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कर्नाटकात प्रवाशासाठी आरटी - पीसीआर निगेटिव्ह चाचणीची सक्ती मागे घेण्यात आली आहे. याबाबतचा आदेश कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव टी. के. अनिलकुमार यांनी शुक्रवारी जारी केला आहे. 

    त्यामुळे सीमाभागातील महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणा-या नागरिकांना होणारा त्रास आता वाचणार आहे. ओमायक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना अनेक निर्बंध लादले होते. कोरोणा प्रतिबंधक लसीकरण झाले असले तरी आरटी पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला होता. त्यामुळे बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागातील नागरिकांना कर्नाटकात कोणत्याही मार्गाने आले तरी त्यांना आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागत होता. मुख्यतःपुणे- बेंगलोर  महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर या सक्तीने अनेकवेळा नागरिक व पोलिसांमध्ये वादही झाला होता. तर अनेकदा आंदोलनेही करण्यात आली होती. त्याच पद्धतीने बेळगाव वरुन चंदगड तालुक्यात येताना बाची येथे तपासणीची सक्ती करण्यात आली होती. त्यावरून सीमा भागातील तसेच चंदगड तालुक्यातील व्यापारी व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता आरटीपीसीआर चाचणी मागे घेतल्यामुळे सीमा भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.No comments:

Post a Comment