भोगोलीचा सच्चा समाजसेवक नारायण चौगुले काळाच्या पडद्याआड - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2022

भोगोलीचा सच्चा समाजसेवक नारायण चौगुले काळाच्या पडद्याआड

 

 कै. नारायण चौगुले

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       समाजाच्या प्रगतीसाठी कृतिशील असणारे, भोगोली गावची शान, मान असणारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण आप्पा चौगुले यांचे वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या आजाराने  निधन झाले. समाजासाठी अहोरात्र झटणारा एक सच्चा कार्यकर्ता काळाच्या पडदयाआड गेल्याने कानूर परिसरात शोककळा पसरली आहे.

       जवळपास शिक्षणाची सोय नसतानाही शिवनगे  येथे वस्तीगृहात राहून जूनी मॅट्रिक परिक्षा प्रथम श्रेणीत पास झाले. त्यानंतर  दौलत फॅक्टरीत निष्ठेने काम केले. पर्चेस विभागाची सर्व कामे त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. त्याच काळात त्यांनी पुण्यात झालेल्या पर्चेस हेड पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावला. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण देणं लागतो.' ह्या विचाराने त्यांनी समाजासाठी अनेक कामे केली. भोगोली गावचा कायापालटामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. स्वर्गीय आमदार नरसिंगराव पाटील ह्याच्या मदतीने गावच्या प्रगतीची अनेक कामे केली. 1980-90 च्या काळात भोगोली सारख्या दुर्गम गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. गावच्या रस्त्याच्या डांबरीकरनाचे काम नारायण चौगुले  यांच्या अथक प्रयत्नाने पूर्ण झाले. गावचे धरण, पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन, गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणात मदत. इतकचं नाही तर त्यांना नोकरी लावण्याचे काम देखील त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची म्हणजेच, भावांचे -भावांच्या मुलांच्या  शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांनीच घेतली. फक्त त्यांच्या जन्मभूमीतच नव्हे तर आपल्या कर्मभूमीतही आपला एक वेगळाच ठसा उमटविला. नारायण चौगुले हे दौलत कॉलनीतल्या प्रत्येक व्यक्तीचे आदर्श होते. प्रत्येकाच्या अडीनडीच्या कामात ते नेहमी तप्तर असायचे. कॉलनीतल्या प्रत्येकाच्या मनपटलावर नारायण चौगुले नेहमी लक्षात राहतील.

अशा ह्या कृतीवंत, वैचारिक अवलियाच्या अनपेक्षीत जाण्याने समस्त हितचिंतक शोकाकुल झाले आहेत.No comments:

Post a Comment