शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय रग्बी स्पर्धेत कोवाड येथील ए. एस. सी. कॉलेजचा संघ प्रथम, कळे संघाला पराभूत करुन मिळविले अजिंक्यपद - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2022

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय रग्बी स्पर्धेत कोवाड येथील ए. एस. सी. कॉलेजचा संघ प्रथम, कळे संघाला पराभूत करुन मिळविले अजिंक्यपद

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतरविभागीय रग्बी स्पर्धेत कोवाड येथील ए. एस. सी. कॉलेजचा संघ. विजेत्या संघासोबत आर. टी. पाटील, अजित व्हन्याळकर, खेळाडू व इतर. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या क्रीडांगणावर भोगावती महाविद्यालय कुरुकली आयोजित शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धा पार पडल्या. यामध्ये कोल्हापूर सांगली व सातारा या तीन विभागातून एकूण तेरा संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोवाड (ता. चंदगड) येथील ए. एस. सी. कॉलेजने अजिंक्यपद पटकावले. 

        सन 2021 22 च्या या स्पर्धेत प्रथम सहभाग घेतलेल्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या संघाने वाय. सी. कॉलेज सातारा, लहू बाळा परितेकर कॉलेज पनोरे,  व भोगावती महाविद्यालय कुरुकली या संघांना पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पी. एम. कॉलेज कळे संघाला 7-5 अशा गोल फरकाने हरवून कोवाड महाविद्यालयाच्या इतिहासात सांघिक पुरुष संघाने प्रथमच विजेतेपद जिंकून इतिहास रचला.

          या संघात वल्लभ पाटील, पृथ्वीराज पाटील, श्रीधर निगडे, विनायक पोवार, योगेश मिसाळ, महेश जोशिलकर, किशोर भरमगावडा, राहुल भिंगुडे, प्रदीप बच्चनट्टी, विठ्ठल कोकितकर, ओंकार पाटील, दयानंद पाटील, वरूण पाटील, विठ्ठल देवन या खेळाडूंचा सहभाग होता. वल्लभ, पृथ्वीराज, श्रीधर, विनायक, महेश आणि किशोर यांच्या आक्रमक खेळी मुळे हे यश प्राप्त झाले. 

        यासाठी प्रा आऱ. टी. पाटील शालेय शिक्षण संचालक तसेच कोल्हापूर रब्बी सचिव दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. अजित व्हण्याळकर धनंजय महाडिक युवाशक्ती तालुका अध्यक्ष यांचे कडून खेळाडूंना स्पोर्ट्स किट देण्यात आले. तसेच खेळाला प्रोत्साहन देणारे सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, संस्था सचिव एम. व्ही. पाटील व संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील व सर्व स्टाफ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रग्बी संघाच्या या यशाबद्दल माजी खासदार धनंजय महाडिक यांनी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थेच्या वतीने डॉ. ए. एस. जांभळे पाटील यांनी टीमचे अभिनंदन केले. 

No comments:

Post a Comment