शिप्पूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना प .स. सदस्य विद्याधर गुरबे सरपंच बाबूराव शिखरे व ग्रामस्थ |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
मौजे शिप्पूर तर्फे नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे विविध विकासकामांचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सतेज उर्फ बंटी पाटील,(राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या फंडातून व विदयाधर गुरबे (सदस्य पंचायत समिती गडहिंग्लज) यांच्या अथक प्रयत्नांतून तिस लाखांचा निधी मंजूर करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पुढील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला शिप्पूर मुख्य रस्ता, स्टॅंण्ड मेन हायवेपर्यत, खडीकरण, डांबरीकरण (१५ लाख रुपये) विठ्ठल मंदिर ते वाय. एस. नाईक गल्ली पर्यंत (जनसुविधा फंडातून - ५ लाख रुपये व सामाजिक न्याय विभाग फंडातून - ५ लाख रुपये), विद्या मंदिर शिप्पूर शाळा कंपाऊंड व आर. सी. सी. गटार (१५ वा वित्त आयोग फंडातून - ५ लाख रुपये अशा विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नामदेव माटले, तंटामुक्त अध्यक्ष भिवा सलामवाडे, गोकुळसुपरवाझर अनिल शिखरे, आप्पासो शिखरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, परशराम नाईक, भिमराव कांबळे, विकास सेवा संस्था चेअरमन राजाराम भालेकर व विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment