मजरे कार्वे शेतकऱ्यांसाठी उद्या ऊस पीक लागवड मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2022

मजरे कार्वे शेतकऱ्यांसाठी उद्या ऊस पीक लागवड मार्गदर्शन


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
प्रगत शेती सेवा केंद्र, यमुना कॉम्प्लेक्स माणगाव रोड मजरे कार्वे (ता. चंदगड) यांच्या वतीने उद्या रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजता चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऊस लागवड व नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंस. माजी सभापती शांतारामबापू पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून पी आर पाटील (प्राचार्य माडखोलकर महाविद्यालय चंदगड), गोपाळ तुकाराम पाटील ( आयकर आधिकारी- बागिलगे), सुनील जगताप (तालुका कृषी अधिकारी) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहून शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सतीश मुकेश हुद्दार, विलास नरसू पाटील, दत्तात्रय दीपक शिंदे आदींनी केले आहे.



No comments:

Post a Comment