तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
राजकारण हे क्षणापुरते तर समाजकारण सदैव असायला हवे .आमदार हा एखाद्या गटाचा , गावचा नसून तो संपूर्ण आम जनतेचा आहे . निवडणूकीपूरत्या भूलथापा देणाऱ्यांची पाठराखण न करता काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल , असे विचार आमदार राजेश पाटील यानी व्यक्त केले .
किणी -कर्यात ( ता. चंदगड ) भागातील विविध गावामध्ये १ कोटी १० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला . यावेळी होसूर येथे आयोजित कार्यकमात आमदार पाटील बोलत होते . कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजाराम नाईक होते . तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य अरूण सुतार होते .
यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या व फंडातून जि.प. सदस्य अरूण सुतार यांच्या फंडातून अंतर्गत रस्ता ५ लाख , कॉक्रीटीकरण २ लाख ,ग्रामपंचायत बांधकाम २० लाख , मराठी शाळा बांधकाम २७ .५० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले . यावेळी सरपंच राजाराम नाईक ,उपसरपंच सौ. छाया पाटील , एस .एल. पाटील ,लक्ष्मण राजगोळकर , एस .वाय. पाटील , हणमंत पाटील , मारूती राजगोळकर , मा .सरपंच पांडूरंग सुतार , ज्ञानेश्वर नाईक य, परशराम पाटील पोमाणी पाटील , दत्तात्रय पाटील , सुर्यकांत पाटील , विष्णू आढाव आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बी .बी. नाईक यानी केले
*१ कोटी १o लाखांच्या कामांचे लोकार्पण व उदघाटन*
आज आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होसूर , कौलगे ,बुक्याळ , कल्याणपूर , कागणी , किणी , नागरदळे आदी गावामध्ये १ कोटी १० लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले.
No comments:
Post a Comment