शिमोग्गा येथे हिंदू कार्यकर्त्याची हत्या केलेल्या आरोपींना त्वरीत अटक करा - श्री राम सेनेचे तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2022

शिमोग्गा येथे हिंदू कार्यकर्त्याची हत्या केलेल्या आरोपींना त्वरीत अटक करा - श्री राम सेनेचे तहसिलदारांना निवेदन

चंदगड येथील तहसिलदारांना निवेदन देताना श्रीराम सेनेचे कार्यकर्ते. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         शिमोग्गा येथे हिंदू कार्यकर्ता हर्ष यांची हत्या झाली आहे. या कार्यकर्त्याच्या बाबतीत भयानक स्वरूपात माणुसकीला काळीमा फासावा असे कृत्य घडले. हत्या केलेल्या आरोपींना त्वरीत अटक करुन आरोपींना  कडक शिक्षा करण्यात यावी. याबाबतचे निवेदन श्री राम सेनेच्या वतीने चंदगड येथील तहसिलदारांना  दिले आहे. 

        मागील काही वर्षांपासून त्या युवकाला SDPI, PFI, CFI या संघटनेकडून मारण्याचा प्रयत्न होत होता. त्या काळात सरकारने त्याला संरक्षण देणे गरजेचे होते. दोन ते तीन वर्षांमध्येच शिमोग्गा सहित काही जिल्ह्यातील हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून लक्ष्य केले जात आहे. सत्तेत असलेल्या सरकारने या घटना गांभीर्याने न घेतल्याने असे कृत्य घडत आहेत. त्या करितां SDPI, PFI, CFI या संघटनाकडून होत असलेले कृत्य पाहून ह्या संघटनांना निषेध करायला पाहिजे होते, ते केलेले नाही. तरी ह्या संघटनांच्यावर त्वरीत बंदी घालावी. 

 खालील मागण्या पूर्ण करण्यात आग्रह करीत आहोत.

१) हत्या केलेल्या आरोपींना त्वरीत अटक व उग्र शिक्षा करण्यात यावी.

२) SDPI, PFI, CFI या संघटनांवर बंदी घालून त्यांच्या प्रमुखांवर कायद्यानुसार कारवाई त्वरीत करण्यात यावी.

३) मृत कुटुंबियांना २५ लाख रुपये परिहार धन देण्यात यावे.

४) हिंदूं कार्यकर्त्यांना व हिंदु प्रमुखांना सुरक्षा पुरविण्यात यावी.

  या वरील सर्व मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

No comments:

Post a Comment