अशोक पाटील |
प्रकाश कोकितकर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्रीकृष्ण दूध संस्थेच्या चेअरमनपदी अशोक रामू पाटील तर व्हा चेअरमन पदी प्रकाश गणपती कोकितकर यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने ११ पैकी ९ जागा जिंकत आमदार राजेश पाटील गटाच्या सलीम मोमिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलचा पराभव केला.
सत्ताधारी पॅनेलचे सलिम मोमिन व सिद्धाप्पा नाईक हे बिनविरोध निवडून आले होते. चेअरमन निवड प्रसंगी नवनिर्वाचित सदस्य मारुती परशराम पाटील, शांता तातोबा पाटील, सविता शिवाजी पाटील, भरत वाकोजी मुंगुरकर, शोभा शिवाजी तेऊरवाडकर, अनिता संभाजी पाटील, पांडू कांबळे, सलीम मोमिन, सिद्धाप्पा नाईक यांची उपस्थिती होती. सहकार विभागाचे एस एस तीबिले व कुलकर्णी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. निवडीनंतर उपसरपंच संभाजी पाटील व उद्योजक रमाकांत कोकितकर यांच्या हस्ते दोहोंचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विनायक पाटील, भरमू पाटील व समर्थकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment