सुळकुडच्या सायकल पटूची किटवाड शाळेला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2022

सुळकुडच्या सायकल पटूची किटवाड शाळेला भेट

 चेतन हेगाजे सुळकुड यांचा सत्कार करताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल पाटील सोबत मुख्याध्यापक अष्टेकर व शिक्षक वर्ग.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          मराठी विद्यामंदिर किटवाड (ता. चंदगड) शाळेतील विविध उपक्रम प्रसारमाध्यमांत पाहून सुळकूड (ता. कागल) येथील युवा कलाकार चेतन हेगाजे याने शाळेला भेट दिली. बीए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या चेतनने 'सुळकूड ते दिल्ली' सायकल प्रवास करून हवा प्रदूषण रोखणे व आर्थिक बचतीचा संदेश दिला आहे. 

         विद्यार्थ्यांनी हेगाजे यांना कुतूहल व जिज्ञासा जागृत करणारे विविध प्रश्न विचारून सायकल प्रवासातील अनुभव जाणून घेतले.  त्याने ३१ डिसेंबर रोजी ६२ पदार्थ स्वतः घरी बनवून ३१ डिसेंबर साजरा केला होता. तसेच त्याने बनवलेल्या व अभिनय केलेल्या 'गैरसमज' ही शॉर्टफिल्मला उत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. 

           "या  हरहुन्नरी युवकाच्या भेटीने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एक प्रेरणा व चेतना मिळाली." असे मनोगत शाळेचे मुख्याध्यापक वैजनाथ अष्टेकर यांनी व्यक्त केले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल पाटील, अध्यापक जे. एम. अस्वले, डी. एल .वांद्रे, के. जे. पाटील उपस्थित होते. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत तारीहाळकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment