प्रत्येक शिक्षकाने भेट द्यावी अशी, 'मी' पणा घालवणारी झाडाखालची शाळा, कोठे आहे वाचा.... - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2022

प्रत्येक शिक्षकाने भेट द्यावी अशी, 'मी' पणा घालवणारी झाडाखालची शाळा, कोठे आहे वाचा....

प्रत्येक शिक्षकाने भेट द्यावी अशी, 'मी' पणा घालवणारी  झाडाखालची शाळा किटवडे धनगरवाडा, ऑपरेशन मदत तर्फे शाळेला शैक्षणिक भेट 

झाडाखालची शाळा किटवडे धनगरवाडा, ऑपरेशन मदत तर्फे शाळेला शैक्षणिक साहित्याची भेट 

चंदगड / प्रतिनिधी :--कोरोनाच्या दिड वर्षाच्या काळात एक दिवस सुध्दा खंड न पडणारी शाळा. ओढयाला पुर आल्यावर पाच किलोमीटर दूर गाडी ठेवून चालत जाणारे अध्यापक कोकीतकर .

आपल्या जादूई अक्षर लेखनाने अध्यापक कोकीतकर आपली शाळा सजवली आहे. गानसम्राज्ञी लतादिदी, अनाथांची माय सिंधूताई, मायबोली मराठी, पर्यावरण काळाची गरज अशा अनेक विषयावर त्यांनी विद्यार्थ्याकडून घेतलेले उपक्रम फाईल पाहिल्यावर त्यांच्या कामाचा व्याप लक्षात येतो.

 आतापर्यत या शाळेला पाच हजार सन्माननीय व्यक्तींनी भेट दिली आहे. मागच्या महिण्यात ख्यातनाम साहित्यीक राजन गवस यानीही भेट देऊन कौतुक केले. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक शिक्षकाने भेट दयावी अशीही शाळा. या शाळेला भेट दिल्यावर 'मी ' पणाचा गळू आपोआपच गळून पडेल यात तिळमात्र शंका नाही.


महाष्ट्राची चेरापुंजी म्हणून ,ओळखले जाणारे किटवडे. चारी बाजूनी ओढे असल्यामुळे पावसाळ्याचे चार महिने जगाचा संपर्क तुटतो,

एखादा शिक्षक दुर्गम भागातील शाळेसाठी काय करू शकतो याचे वास्तव उदाहरण म्हणजे अध्यापक कोकीतकर 

मी पण ज्यांचे पक्व फळा परी सहजपणाने गळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो

चराचराचे होऊन जीवन

स्नेहासम पाजळले हो

कवी बा.भ. बोरकर यांच्या काव्यातील मूर्तिमंत व्यक्तीमत्व म्हणजे विद्यामंदिर किटवडे धनगरवाडा ता.आजरा येथील अध्यापक उत्तम कोकीतकर  अशा परिस्थितीत शाळा जगवण्याचेच नव्हे तर फ़ूलवण्याचे काम कोकीतकर यानी केले आहे.

पहिली ते आठवीचे वर्ग. विद्यार्थी संख्या तेरा. एक शिक्षक. मुलांना सुट्टीतही . हवीहवीशी वाटणारी शाळा. पावसाळ्यात गोठ्यात तर पावसाळा संपल्यावर झाडाखाली भरणारी शाळा. दोनशे कविता, गाणी पाठ असणारी मुले,

अस्सलखित इंग्रजी भाषेत नाटिका सादर करणारी मुले, वनऔषधी झाडांची नावे सांगणारी मुले हे पाहिल्यावर ही मुले धनगरवाडयावरची आहेत यावर विश्वासच बसत नाही.

बकऱ्यांच्या छोटया पिल्लांनाच शाळेत घेऊन येणारा विठ्ठल, तीन वर्षाच्या लहान भावाला शाळेत घेऊन येणारी अंबाबाई , आजीला सोबत घेऊन येणारी विठाबाई. या मुलांची शिक्षणाविषयीची ओढ पाहून भविष्यात ही धनगरवाडा शाळा शिक्षण क्षेत्रातील पंढरी झाल्यास नवल वाटू नये.

  शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक शिक्षकाने भेट दयावी अशीही शाळा. या शाळेला भेट दिल्यावर 'मी ' पणाचा गळू आपोआपच गळून पडेल यात तिळमात्र शंका नाही.

'ऑपरेश मदत ' टिमच्या वतीने आज शाळेला भेट देण्याची संधी मिळाली. शाळेला ग्रीन बोर्ड, खडू, डस्टर, बसण्यासाठी जमखाना, कंपास बॉक्स, वह्या इ.साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला ऑपरेशन मदतचे राहूल पाटील, पद्मप्रसाद हूली, संजय साबळे, मातोश्री सरस्वती साबळे उपस्थित होते.




No comments:

Post a Comment