आमदार राजेश पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालूक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी व रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे जिल्हा उपरूग्णालय व ट्रामा सेंटरसाठी 33 कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यानी सी. एल. न्यूजशी बोलताना दिली.
आमदार राजेश पाटील पुढे बोलताना म्हणाले, ``पाटणे फाटा येथे ५० बेडच्या उपरूग्णालयाची व २० बेडच्या ट्रामा केअर सेंटरची मागणी शासनाकडे केली होती. यासंदर्भात शासन व आरोग्य विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. आज या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात या दोन्ही इमारतींच्या बांधकामासाठी ३३ कोटी ९२ लाख रूपये मंजूर करण्यात आले.
या इमारतीच्या बांधकामांबाबत बैठकीस मनोजकुमार सौनिक, अ.मु.स., वित्त विभाग / सार्वजनिक बांधकाम विभाग, डॉ. प्रदीप व्यास, अ.मु.स.. सार्वजनिक आरोग्य विभाग, सौरभ विजय, सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, प्रशांत नवघरे, सचिव (बांधकामे). सार्वजनिक बांधकाम विभाग,अतुल कोदे, सह सचिव, महसूल व वन विभाग, दिलीप गावडे, सह सचिव या बैठकीस उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभाग विभागाकडून हि प्रस्तावित इमारत उप जिल्हा रुग्णालय G + १ व ट्रॉमा केअर सेंटर G असून त्याचे क्षेत्रफळ ७००४.१३ चौ.मी. आहे. या रुग्णालमुळे चंदगड वासीयांची मोठी सोय होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment