पुरस्कार मिळाल्यानंतर सत्कार करताना शिक्षक. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
केंद्रीय प्राथमिक शाळा आमरोळी (ता. चंदगड) च्या अध्यापिका सौ. शुभांगी महादेव नाईक याना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ / महिला आघाडी कोल्हापूर यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला.
सौ. शुभांगी नाईक यानी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनिय कार्य केले आहे.मलगेवाडी येथे काम करताना राजर्षी शाहू अभियान केंद्रात दुसरा क्रमांक मिळवला होता. रेडक्रॉस अंधासाठी जास्त निधी जमवलेमुळे जिल्हास्तर पुरस्कार, इंग्रजी अनुधावन महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक सुरेश पवार साहेब यांचेकडून अतिउत्कृष्ट शेरा मिळाला आहे.
शैक्षणिक उठाव ६५००० हजारांचा निधी जमवला. ळामवाडी येथे राजर्षी शाहू अभियान केंद्र स्तर प्रथम क्रमांक मिळवला होता. शिष्यवृत्ती मध्ये ४ थी चा १०० टकके निकाल लावला होता. कन्या विद्या मंदिर नेसरी येथील मुलांना गणवेश,शैक्षणिक साहित्य वाटप केले. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा केंद्रातील विद्यार्ध्यांना शिल्ड वाटप केले. केंद्रशाला आमरोळी येथील गरीब मुलांना साहित्य वाटप केले.
विविध विषयावर कविता लेखन संग्रह. तसेच अध्यापनात स्वतः बनविलेल्या शैक्षणिक साहित्य निर्मितीचा वापर केल्याने विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल हा पुरस्कार देवून गौरव केल्याने सौ. नाईक यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment