चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जमीन वादात सरपंच चाळोबा आप्पाजी पाटील यांनी आपल्या भावाला मदत केल्याच्या रागापोटी शंकर गणपती पाटील (रा. म्हाळेवाडी, ता. चंदगड) याने सहा मित्राकरवी खुनी हल्ला करून सरपंचांचाचा काटा काढल्याची माहीती पोलीस तपासात पूढे आली आहे.
सरपंच पाटील यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. सरपंच पाटील यांना मारहाण प्रकरणी आत्तापर्यंत सात आरोपींना अटक केली असून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी तर उर्वरित पाच जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपी कार्तीक परशराम चौकुळकर (वय२२ रा. आलबादेवी) व तानाजी शिवाजी मोरे (वय २७, रा.आलबादेवी) यांना न्यायालयीन कोठडी तर सोनल चोकोबा कांबळे (वय २९, रा. मादयाळ, ता. कागल), शंकर गणपती पाटील (रा.म्हाळेवाडी, ता.चंदगड), चंद्रकांत बाळू नाईक (वय१९ रा.कुप्पे, ता. गडहिंग्लज), सुनिल गोपाळ नाईक (वय २२, अर्जुनवाडी), जोतीबा परशराम नागरदळेकर (वय १९, रा.कुदनुर, ता. चंदगड) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाळेवाडी येथील शंकर पाटील त्याचा भाऊ विश्वनाथ गणपती पाटील यांचेत शेतजमीन व वाटणीचे कारणावरुन वाद होता. सरपंच चाळोबा पंच म्हणुन त्यांनी विश्वनाथ गणपती पाटील यांची बाजू घेवून आपणास नाहक त्रास दिल्याच्या कारणावरून मुख्य आरोपी शंकर पाटील यांने आरोपी सोनल कांबळे यास सरपंच पाटील यांचा काटा काढण्यास सांगीतल्याचे प्राथमिक तपास दरम्यान समोर आले आहे. सरपंच चाळोबा पाटील हे दि. ०१ मार्च २०२२ रोजी काम आवरून म्हाळेवाडी येथुन हलकर्णी गावाकडे जात असताना म्हाळेवाडी ते शिवणगे दरम्यान शिवाजी पाटील यांच्या शेतात तिघांनी श्री. पाटील यांना जवळच्या काजु बागेत ओढत नेवून लोखंडी रॉडने डोके, पाया व मनगटावर जबर मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. पाटील यांच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदगड पोलीस ठाणेत गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी तपसा अंतर्गत माणगाव, कोवाड, शिवणगे पाटणे फाटा परीसरातील सीसीटीव्ही फुटेज व्दारे, तांत्रीक माहीती तसेच गोपनीय बातमी आणि सोशल मीडियाच्या मदतीने गुन्हयात सहभाग असलेले दोघांना पूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून इतर पाच जणांना अटक करण्यात आली.
चंदगड पोलीसांची कार्यतत्परता
म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील सरपंच चाळोबा पाटील यांच्यावर अज्ञातांनी खुनी हल्ला केल्याचे वृत्त चंदगडसह जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. आरोपीना अटक करण्याचे चंदगड पोलिसांसमोर आव्हान होते. पण चंदगड चे पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले याच्या मार्गदर्शनाखाली तपासाच्या दृष्टिने तपासाठी चार पथके वेगवेगळ्या दिशेला पाठवली.
तपसा अंतर्गत माणगाव, कोवाड, शिवणगे पाटणे फाटा परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रीक माहीती तसेच गोपनीय बातमी आणि सोशल मीडियाच्या मदतीने आरोपीच्या चारच दिवसात मुसक्या आवळल्याने चंदगड पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment