महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला दिनी उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2022

महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला दिनी उपक्रम

  

महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला दिनी उपक्रम

कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा
  मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या महिला अधिकारी-कर्मचारी, कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आशा वर्कर्स, महिला आरोग्य व पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी चारुशीला पाटील होत्या.
 कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना व  जिजाऊंचा फोटोचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन वागळे यांनी केले तर आभार प्रदर्शन चारुशीला पाटील यांनी केले. कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी व्याख्यान, स्पॉट गेम्स झुंबा प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी त्वरिता पाटील यांना  शहर अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने नवनिर्वाचित विभागीय उपाध्यक्ष अश्विनकुमार वागळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, नवनिर्वाचित मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष विनायक पाटील, प्रवीण पाटील, जिल्हा सचिव संजय रणदिवे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष अजय शिंदे, संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक निलेश सुतार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनंदाताई चव्हाण, उपजिल्हाअध्यक्षा शहनाज शेख, जिल्हा सचिव मीना नलवडे, शहर सचिव जयश्री जाधव, शहर उपाअधक्ष प्राजक्ता आबंले, वंदना जाधव, दिपाली देशमुख, आर्या कांबळे, सुप्रिया दाभाडे, जिल्हा प्रवक्ता  रंजना पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष गीतांजली काटकर यांच्यासह सर्व पदाधिकारी  महिला कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment