'मराठा सेवा संघ' जिल्हा प्रवक्तेपदी शहाजी देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2022

'मराठा सेवा संघ' जिल्हा प्रवक्तेपदी शहाजी देसाई

शहाजी देसाई

गारगोटी : सी एल वृत्तसेवा
      मराठा सेवा संघाच्या जिल्हा प्रवक्ते पदी शहाजी देसाई कडगाव, ता. भुदरगड (विषय शिक्षक विद्यामंदिर वासनोली, ता. भुदरगड) यांची हुपरी ता. हातकणंगले येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठा सेवा संघ महामंडळ सभेत नियुक्ती करण्यात आली. देसाई यांचे गेल्या तीस वर्षांत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती, शिक्षक जागृती, मराठा आरक्षण जनजागृती करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे बहुमोल कार्य केले आहे. 'शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद' कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून गेली काही वर्षे ते कार्यरत आहेत. मराठा सेवा संघाच्या विभागीय पातळीवर त्यांच्या योगदानाची दखल या निमित्ताने घेण्यात आली. हुपरी येथील मराठा सेवा संघाच्या आणि ३३ कक्षांच्या सभेत मराठा सेवा संघाचे नूतन अध्यक्ष शिवश्री महिपती बाबर यांनी त्यांची निवड घोषित केली. 
    मराठा सेवा संघ ही शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय पातळीवर काम करणारी मोठी संघटना आहे. ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेंबर १९९० रोजी शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने स्थापन केलेल्या संघटनेने विविध सामाजिक विषयांना वाचा फोडल्यामुळे अल्पावधीत देशभर नावलौकिक मिळविला आहे.
    यावेळी विश्व शाहिर परिषद प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण, अशोक खाडे, विनायक पाटील, सुरेश पाटील, प्रशांत कुट्रे, दिलीप सावंत, रणजीत आरडे, प्रविण पाटील, सुशांत निकम, भरत पवार, नागेश काळे, डॉ. जयश्री चव्हाण, संजय काटकर, मानसिंग देसाई, गणपती राठोड, संजय रणदीवे, डी के देसाई, राजेंद्र रत्नबल , श्रीकांत वैजनाथ पाटील, सचिन पाटील मराठा सेवा संघाचे सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment