चंदगड /प्रतिनिधी
मुगळी (ता. चंदगड) येथे दलितवस्तीमध्ये केलेला नवीन डांबरी रस्ता अवकाळी पावसाने खचल्याने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा अर्धवट रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. जि.प.सदस्य सचिन बल्लाळ यांच्या निधीतून ७ लाखाचा निधी या रस्त्यासाठी मंजूर आहे.ठेकेदाराने सदर रस्ता गुरूवार दि.२४मार्च रोजी केला.शनिवार दि.२६ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने या नव्या रस्यावर पाणी साचून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ता आतच जगोजागी खचला आहे.रस्त्याच्या मधोमध घातलेला सिमेंट पाईपही बोजड वाहन गेल्याने फुटले आहेत.त्यामुळे बांधकाम विभागाने या ठेकेदाराकडून नवीन काम करून घ्यावे,अन्यथा ग्रामस्थ अंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
No comments:
Post a Comment