गुढीपाडव्याला निटुरचे कुस्ती मैदान; थरारक लढतींसह महिला कुस्तीचे आकर्षण - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2022

गुढीपाडव्याला निटुरचे कुस्ती मैदान; थरारक लढतींसह महिला कुस्तीचे आकर्षण


 कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
 थरारक लढतींसाठी प्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यातील निट्टूर येथे खास गुढीपाडव्यानिमित्त २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. कोरोना मुळे गेली दोन वर्षे न झालेले मैदान यावर्षी पुन्हा होत असल्यामुळे कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील पैलवान व कुस्ती शौकिनांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
   मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पै सुबोध पाटील (भोसले व्यायाम शाळा सांगली) विरुद्ध पै किरण दावणगिरी (कर्नाटक केसरी) द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै अरुण बोंगाळे (मोतिबाग तालीम कोल्हापूर) विरुद्ध संगमेश  बिराजदार (रत्नकुमार मठपती आखाडा) तर तृतीय क्रमांकाची कुस्ती शशिकांत भोंगार्डे (बाणगे) विरुद्ध शिवय्या पुजारी ( मठपती आखाडा) यांच्यात रंगणार आहे. याशिवाय ऋषिकेश पाटील (बानगे) विरुद्ध पवन चिकदिनकोप (बेळगाव), रोहित कंग्राळी विरुद्ध अभिषेक कापडे (बानगे), बाबा रानगे (मोतीबाग) विरुद्ध कीर्ती पाटील (कारवे), विक्रम शिनोळी विरुद्ध प्रकाश इंगळगी, सुभाष निंगुरे विरुद्ध प्रेम कंग्राळी, हनुमंत इंगळी विरुद्ध रत्नाकर दावणगिरी, स्वप्नील पाटील विरुद्ध सुशांत कंग्राळी,  कार्तिक जाधव (निटूर)विरुद्ध कैलास पाटील, संभाजी पाटील (निटूर) विरुद्ध शुभम पाटील (कंग्राळी) आदी ५६ कुस्त्यांसह यंदा प्रथमच महिला कुस्त्यांचे आकर्षण आहे. यात पै स्वाती (कडोली) विरुद्ध पूजा (राशिवडे), वृषाली (राशिवडे) विरुद्ध सानिका (कडोली) आदी तुल्यबळ लढती होतील. सालाबाद प्रमाणे यंदाही भीमा कुरबुर (मलतवाडी) यांनी बक्षीस ठेवलेल्या जंगी मेंढ्या साठी जोड पाहून कुस्ती होईल. आखाडा पूजन माजी कुस्तीगीर भरमू उर्फ पोटू पाटील व नरसु दत्तू पाटील यांच्या हस्ते होणार असून मैदानात आमदार राजेश पाटील, भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, रमेश रेडेकर, शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील, प्रा दिपक पाटील, कल्लाप्पा भोगण, सुरेश घाटगे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कुस्ती समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांचे असून हलगी सम्राट हनमंत घुले यांच्या रणहलगीचा कडकडाट यावेळी होणार आहे. कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन निट्टूर ग्रामस्थ व तालीम मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment