चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत "कनिष्ठ अभियंता" या पदासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मौजे बिजूर (ता. चंदगड) येथील पवन एकनाथ चौकुळकर हा 99.80 टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात 24 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याने पुणे विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर कोणताही खाजगी क्लास न लावता स्वयंःअध्ययनातूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाने बिजूर ग्रामस्त व शिक्षक कॉलनी चंदगड परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment