सुसंस्कारीतपणा शिवाय व्यक्तिमत्व विकास अशक्य - प्रांताधिकारी वाघमोडे, नेसरी कॉलेजचे विंझणेत श्रमसंस्कार शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2022

सुसंस्कारीतपणा शिवाय व्यक्तिमत्व विकास अशक्य - प्रांताधिकारी वाघमोडे, नेसरी कॉलेजचे विंझणेत श्रमसंस्कार शिबिर

विंझणे येथील श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे सोबत मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         व्यक्तिमत्व विकासात सुसंस्कारीत पणा हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. असे प्रतिपादन गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले. ते विंझणे (ता. चंदगड) येथे तु. कृ. कोलेकर महाविद्यालय नेसरी च्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटक  बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा जिप. सदस्य ॲड. हेमंत कोलेकर होते.

         स्वागत प्राचार्य एस. बी. भांबर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विकास क्षीरसागर यांनी केले. यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी म्हणाले ज्या ``आई-वडिलांनी आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्याला मोठे केले. त्यांचे ऋण कदापी विसरता कामा नये. तथापि भौतिक सुखाच्या मागे लागून त्यांना दुर्लक्षित करण्याचे प्रमाण वाढले आहे. आई वडिलांना त्रास देणाऱ्या करंट्यांना समाजाने वेळीच रोखले पाहिजे. प्रसंगी अशा घटनांबाबत समाजाने पोलिसात तक्रार दाखल करावी असे आवर्जून सांगितले.`` यावेळी बोलताना ॲड. कोलेकर म्हणाले ``श्रम व संस्कार एकत्र आल्यास व्यक्तिमत्त्वाची निश्चितच जडणघडण होईल.`` यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, गडहिंग्लजचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, सिटीसर्वे अधिकारी एस. टी. घुले, अनिरुद्ध रेडेकर, संजय नाईक आदींची भाषणे झाली.  सरपंच लिलाबाई विंझणेकर, मंडल अधिकारी सुरेश टिपुगडे, आप्पासाहेब चौगुले, वसंत निकम, आबासाहेब चव्हाण, चंद्रकांत शिवणकर, उपसरपंच केशव निकम आदींची उपस्थिती होती. प्रकल्प अधिकारी एस. बी. चौगुले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment